भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें

kay dhovilen kataden | kalakut bhitari kuden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥ उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥ घेसी बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥२॥ लावूनि बैसे टाळी । मन इंद्रियें मोकळीं ॥३॥ हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां॥४॥ तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥५॥