भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवेश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती

kaveshvarancha to amhansi vital | prasad vongal chivaditi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कवेश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥ दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होईल तोंड ॥ध्रु.॥ सोन्यासेजारी तों लाखेची जतन । सतंत ते गुण जैसेतैसे ॥२॥ सेव्य सेवकता न पडतां ठावी । तुका म्हणे गोवी पावती हीं ॥३॥