भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख

kavatukavani bolatasen laden | arush vankaden karuni mukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥ दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥ सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग ॥२॥ धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥३॥ तुका म्हणे तुज आमची च गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥४॥