भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवळाचिया सुखें । परब्रम्ह झालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें

kavalachiya sukhen | parabramha jhalen gorakhen | hat gouni khay mukhen | botasandi lonachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कवळाचिया सुखें । परब्रम्ह झालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥ कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरी छंदें नाचतसे ॥२॥ काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवें तया । आम्ही ही सोंकलों ॥३॥