भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें

kathe baisoni sadaren | sukhacharcha parasparen | naval kay to uddhare | anik tare sugandhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥१॥ पुण्य घेई रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेई सेवटीं ॥ध्रु.॥ कथा विरस पाडी आळस । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसें । विटाळसी नावेसी ॥२॥ सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहे म्हणे हरी । विनंती करी तुका हे ॥३॥