भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां

katha trivenisangam dev bhakti ani nam | tethinchen uttam charanaraj vanditan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥ जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरीकथा ॥ध्रु.॥ तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां॥२॥ अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णु या सुखा ॥३॥