भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा करुनियां दावी प्रेमकाळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा

katha karuniyan davi premakala | antari jivhala kukarmacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा करुनियां दावी प्रेमकाळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥१॥ तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी । लटिका धरी बोंडी नासिकाची ॥धृ॥ टिळे टोपी माळा देवाचे गवाळे । वागवी ओंगळ पोटासाठी ॥२॥ गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ॥३॥ कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमेवीण डोळे गळताती ॥४॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥५॥