भजनी मालिका
← भजनांकडे परत

कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईल लेखूं

kasturichen angin minali mruttika | mag vegali kan yeil lekhun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईल लेखूं ॥१॥ तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ती सरों द्याव्या ॥ध्रु.॥ इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें ओहोळ तों चि ॥२॥ तुका म्हणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥३॥