भजनी मालिका
← भजनांकडे परत

कशासाठीं पोसियेलें

kashasathin posiyelen

कशासाठीं पोसियेलें । हें तूं सांग बा विठ्ठलें ॥१॥ मज कोण आहे गणगोत । न दिसे बरी तुझी नीत ॥२॥ मोकलित दातारा । काय येते तुझे पदरा ॥३॥ म्हणे चोखियाचा कर्ममेळा । वोखटपण येईल तुला ॥४॥