भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एक एकां

kariti taya vevasav ahe | yethen vha re sahe ek ekan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एक एकां॥१॥ गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥ प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥२॥ तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होईल हा सीण निवारोनि ॥३॥