भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा

karitan verajhara | ubha na rahasi vevhara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥ हे तों झोंडाईचे चाळे । काय पोटीं ते न कळे ॥ध्रु.॥ आरोगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥ तुका म्हणे किती । बुडविलीं आळवितीं॥३॥