भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां देवार्चन । घरा आले संतजन

karitan devarchan | ghara ale santajan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥ देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥ शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥ तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥