भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें

karisi laghaven | tun hen khelasi aghaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥ केला अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥ इत्थंभुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥ तुका म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥