भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें

karin aisi dhanvadhanvi | chitta lavin charanapen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥१॥ मग तो माझा मायबाप । घेईल ताप हिरूनी ॥ध्रु.॥ बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥२॥ तुका म्हणे करुणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥३॥