भजनी मालिका
← भजनांकडे परत

करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देतां दान । नरका जाती उभयतां

kari anikancha apaman | khal chhalavadi bramhan | taya detan dan | naraka jati ubhayatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥ तैसें झालें दोघांजणां । मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥ घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव । बुडवी तारूं तरतीया ॥२॥ चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥३॥