भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे

karavi te puja manen chi uttam | laukikachen kam kay ase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥ कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साच अंगीं ॥ध्रु.॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥ तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥