भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम

karaven ten kam | ugach vadhavava shram

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥ अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥ दुजयाची सत्ता । न चलेसी झाली आतां ॥२॥ आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥३॥