भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावें कीर्तन । मुखीं गावे हरीचे गुण

karaven kirtan | mukhin gave hariche gun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावें कीर्तन । मुखीं गावे हरीचे गुण ॥१॥ मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥ शांतिखड्ग हातीं । काळासी ते नागविती ॥२॥ तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥