भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव

karava varshav | trushakrant jhala jiv

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव ॥१॥ पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगदिश ॥ध्रु.॥ संयोगें विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥ तुका म्हणे फळें । चरणांबुजें ते सकळ ॥३॥