भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावा उद्धार हें तुम्हां उचित । आम्ही केली नीत कळली ते

karava uddhar hen tumhan uchit | amhi keli nit kalali te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावा उद्धार हें तुम्हां उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥ पाववील हाक धांवा म्हणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥ दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आम्ही भाव जाणतसों ॥२॥ तुका म्हणे माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥३॥