भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे

karava sankoch chittasi bhovata | hoy te bahuta sukh kije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे ॥१॥ देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥धृ॥ रुसावें फुगावें आपुलियावरी । उरला तो हरी सकळ ही ॥२॥ तुका म्हणे संतपण याची नांव । जरी होय जीव सकळांचा ॥३॥