भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली

karava kantala navhe hen uchit | adhin cha kan prit laviyeli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥ जाणतसां तुह्मीं लाघव रूपाचें । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥ काय म्हणऊनि आलेती आकारा । आम्हां उजगरा करावया ॥२॥ तुका म्हणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥३॥