भजनी मालिका
← भजनांकडे परत

करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा

karanen ten deva | he chi ek pave seva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥१॥ अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥ हें चि एक वर्म । काय बोलिलो तो धर्म ॥२॥ तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥