भजनी मालिका
← भजनांकडे परत

कारण परिसणा कामधाम नेम

karan parisana kamadham nem

कारण परिसणा कामधाम नेम । सर्वाआत्माराम नेमियेला ॥१॥ तें रूप सुंदर सर्वागोचर । कृष्ण परिकर गोपवेषे ॥२॥ वेदादिक कंद ॐकार उद्बोध । साकार प्रसिद्ध सर्वाघटीं ॥३॥ निवृत्ति म्हणे धाम कृष्ण हा परम । सौख्यरूपें सम वर्ततसे ॥४॥