भजनी मालिका
← भजनांकडे परत

कराल तें करा । हातें आपुल्या दातारा

karal ten kara | haten apulya datara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥१॥ बळियाचीं आम्ही बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥ आतां कोठें काळ । मध्ये रिघेल ओंगळा ॥२॥ तुका म्हणे पंढरीराया । थापटितों ठोक बाह्या ॥३॥