भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी

kanthin krushnamani | nahin ashubh te vani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥ हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥ नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥२॥ वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥३॥ तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अकळा ॥४॥