भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं न मागे कोणांसी । तोचि आवडे देवासी

kanhin na mage konansi | tochi avade devasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं न मागे कोणांसी । तोचि आवडे देवासी ॥१॥ देव तयासी म्हणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥ भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥२॥ नाहीं नाहीं त्यासमान । तुका म्हणे मी जमान ॥३॥