भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं मागणें हें आम्हां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों

kanhin maganen hen amhan anuchit | vadilanchi rit janatason

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं मागणें हें आम्हां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥१॥ देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धि राहिलीसे ॥ध्रु.॥ शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥२॥ तुका म्हणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥३॥