भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं जडभारी । पडतां ते अवसरी

kanhin jadabhari | padatan te avasari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं जडभारी । पडतां ते अवसरी ॥१॥ तुझे आठवावे पाय । आह्मीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥ तहान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥ तुका म्हणे देहयोगे । वारंवार पीडिती भोगे ॥३॥