भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव

kanhin chinta kona nahin konevishin | kari dvarakesi rajya dev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥ द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून रक्षीधर्म पाळी ॥२॥ पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥ अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥ अभिमान नाहीं तुका म्हणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥५॥