भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां रे तुह्मीं ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें वोडवलें

kan re tuhmin theva bahutan nimitten | majhiya sanchiten vodavalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां रे तुह्मीं ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें वोडवलें ॥१॥ भक्तीप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥ पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रह्मानंदें ॥२॥ तुका म्हणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळाअसे वरी ॥३॥