भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां जी तुम्हीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायीच्या ठायीं

kan ji tumhin aise navha krupavant | nive majhen chitta thayichya thayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां जी तुम्हीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायीच्या ठायीं ॥१॥ कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥ दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें राखावीं तीं ॥२॥ तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण म्हणऊनि ॥३॥