भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव

kan ji amhan hoten doshachen darshan | tuj samarpun dehabhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥ पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥ कां जी आम्हांवरी आणिकांची सत्ता । तुम्हांसी असता जवळिकें ॥२॥ तुका म्हणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥३॥