भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा

kan ho tumhi majhi vadavili vani | neda he nivaduni panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥ आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥ स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥२॥ तुका म्हणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥३॥