भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन

kan ga kivilavana kelon dinacha din

कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ती जालीसी दिसे ॥१॥ लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥ लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥२॥ तुका म्हणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादावांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥