भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला

kan ga dharma kela | ason sattecha apula

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥ उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥ नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥२॥ तुका म्हणे इच्छा । तैसा करीन सरसा ॥३॥