भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया

kamen pidilon maya | bahu mari nahin daya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥ तुझ्या राहिलों आधारें । झालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥२॥ तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥