भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य

kamatura bhay laj na vichar | sharir asar trunatulya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥ नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥ लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥२॥ तुका म्हणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥३॥