भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं झालों देवा

kamakrodh majhe laviyele pathin | bahut himputin jhalon deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं झालों देवा ॥१॥ आवरीतां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥ तुझिया विनोदें आम्हां प्राणसाटी । भयाभीत पोटीं सदा दुःखी ॥२॥ तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थासी ॥३॥