भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें

kam krodh majhe jitati sharirin | kovalen ten vari bolatasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥ कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥ पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध झालें ॥२॥ तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥३॥