भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें

kam krodh amhi vahile viththalin | avadi dharili payansaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥२॥ तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रम्हांडाचा ॥३॥