भजनी मालिका
← भजनांकडे परत

कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं

kai mat majhe aikati kan | bolatan vachan santan mukhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥ केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥ म्हणऊनि मुख अवलोकितों पाय । हे चि मज आहे थोरी आशा ॥२॥ माझिया मनाचा हाचि पै विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥३॥ तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलों मी ऐसा साच भावे ॥४॥