भजनी मालिका
← भजनांकडे परत

कई ऐसी दशा येईल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे

kai aisi dasha yeil majhya anga | chitta panduranga jhuratase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कई ऐसी दशा येईल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥ नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥ काय ऐसा पात्र होईन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईल ॥२॥ तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन तें नित्य प्रेमसुख ॥३॥