भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें

jyanen jyanen jaisen dhyaven | taisen vhaven krupalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥१॥ सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥ अवघें साकरेचें अंग । नये व्यंग निवडितां ॥२॥ तुका म्हणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥३॥