भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें

jyache smaranen kaivalya sandanen

ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें । एका नामें होणें चतुर्भुज ॥ १ ॥ तें रूप वैकुंठ भोगिती गोकुळीं । नंदाचिये कुळीं बाळकृष्ण ॥ २ ॥ न संपडे ध्यानीं लावितां उन्मनी । तो गोपाळाचे कानीं सांगे मातु ॥ ३ ॥ निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी । मन ठाणदिवी ह्रदयामाजी ॥ ४ ॥