भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास

jyache ganvin kela vas | tyasi nasaven udas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास ॥१॥ तरीच जोडिलें तें भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥ वाढवावी थोरी । मुखें म्हणे तुझे हरी ॥२॥ तुका म्हणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥३॥