भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो

jvaralyasi kadha aushadh pachan | mudhan narayan smaravito

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥ भवव्याधि येणें तुटेल रोकडा । करूनियां झाड निश्चयेसी ॥ध्रु.॥ आणिकां उपायां अनुपान कठिण । भोगे बरें सीण शीघ्रवत ॥२॥ तुका म्हणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥३॥