भजनी मालिका
← भजनांकडे परत

जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां देह दुःख थोर आहे

junjhayachya goshti aikatan chi sukh | karitan deh duhkh thor ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां देह दुःख थोर आहे ॥१॥ तैसी हरीभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥ पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥ तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रखुमादेवीवर जोडावया ॥३॥