भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न वळे

jivha jane phiken madhur kshar | yer mas par hatas na vale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न वळे ॥१॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥ परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥ एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी॥३॥ तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥४॥