भजनी मालिका
← भजनांकडे परत

झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां

jhunjar te ek vishnudas jagin | papapunya angin natale tyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥ ऊर्ध पुंड्र भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥२॥ तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥